सामाजिक

विडा,सारणी सांगवी येथील बी एस एन एल नेटवर्क सेवा वारंवार खंडित होणारी सुधारित करा – बाजीराव ढाकणे 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे जोला व पंचक्रोशीतील बी एस एन एल मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या काही महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विडा आणि सारणी (सांगवी) या दोन्ही ठिकाणी बी एस एन एल चे टॉवर असुन दोन्ही ठिकाणचे बी एस एन एल चे टॉवर दोन- दोन दिवस नेटवर्क रेंज पूर्णपणे बंद पडणे, नेटवर्क दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे,कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला,बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे.इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट,पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर बी एस एन एल कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा सुरळीत करावी,कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.बी एस एन एल कंपनीच्या ढिसाळ सेवेविरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्धार व्यक्त केला असून अनेक युवकांनी आपली बी एस एन एल सिमकार्डे इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.तातडीने सेवा सुधारली नाही,तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पंचक्रोशी तील नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!