सामाजिक

रोहन गलांडे यांच्या उपोषणाची दखल सोमवारी घेतली नाही तर धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार- बाळराजे आवारे पाटील 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे सुरू असलेल्या रोहन गलांडे पाटील यांच्या अमरण उपोषणाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी भेट दिली व त्यांनी उद्या प्रश्न मार्गी नाही लागले तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शैर्य प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु असा इशारा तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या विषयी व्यक्त केला आहे.यावेळी मराठवाडा प्रमुख अन्नासाहेब जाधव,संदीप भैय्यासाहेब चाळक व इतर गावकऱ्यांसोबत आमरण उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला बेमुदत आमरण उपोषण पाचवा दिवस असुन प्रशासन झोपेतच होते.

निगरगट्ट प्रशासनाने रोहन गलांडेला जिवे मारायच ठरवले काय ? बेमुदत आमरण उपोषणाचा चौथा दिवस,प्रकृती चिंताजनक,प्रशासन,केज तहसीलदार गिड्डे तुम्हाला जाग कधी येणार?असे प्रशासनाला अन्नासाहेब जाधव यांनी बीडीओ, तहसीलदार यांना फोन वर बोलले की लवकर आमरण उपोषणाची दखल घेतली नाही व मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिवस्मारकाचे जनक शिवश्री बाळराजे आवारे पाटील यांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रराज्य यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!