सामाजिक

कोरेगाव येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त येवता जिल्हा परिषद सर्कल मधील कोरेगाव येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच तांदळे वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.१९ डिसेंबर रोजी शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.हा उपक्रम भाजपा नेते श्री.विष्णू भाऊ घुले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना वह्या, पेन,पेन्सिल व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री.विष्णू भाऊ घुले यांच्यासह त्यांचे सहकारी,प्रमुख कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.या उपक्रमा बद्दल शाळेतील शिक्षक बांधवांनी विष्णू भाऊ घुले व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून,अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यास मदत होईल,अशी भावना व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!