केज शहरातील शिक्षक कॉलनी चौकास लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव,नगर पंचायत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर जनतेची मागणी पूर्ण

केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायतच्या इतिहासात दि.१६ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी एक अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील बीड -केज महामार्गावरील चौकास दिवंगत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव देण्याचा बहुप्रतिक्षित ठराव आजच्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेत एकमताने मार्गीलावण्यात आला.या निर्णयामुळे समस्त शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
लोकभावनेचा आदर! पत्रकाराच्या पुढाकाराला यश
या चौकास लोकनेते स्व.मुंडे साहेबांचे नाव देण्याची मागणी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रकाश एकनाथ मुंडे यांनी सर्व प्रथम केली होती.मुंडे साहेबांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त दि.१२ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी पत्रकार प्रकाश एकनाथ मुंडे आणि त्यांच्या सहकारी युवक मित्रांनी या भागात हा चौक लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब चौक म्हणून स्थापित करण्याची मोहीम सुरू केली होती.याच लोकभावनेचा आदर करत,पत्रकार प्रकाश मुंडे यांनी नगरपंचायतकडे रीतसर ठराव दाखल केला होता.त्यांच्या या मागणीला नगर पंचायत सभेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
आभार आणि कौतुकाचा वर्षाव
हा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या निर्णयासाठी विशेषतः नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड,नगर सेवक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते नगरसेवक डॉ.हारुणभाई इनामदार तसेच,केज नगरपंचायत मधील सर्व पक्षीय नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी.
पत्रकार प्रकाश मुंडे यांनी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानताना सांगितले की,आज नगरपंचायतने लोक नेत्यांच्या नावाचा सन्मान करून जनतेच्यामागणीचा आदर केला आहे.यामुळे भावी पिढीला साहेबांचे कार्य प्रेरणा देत राहील.केज-बीड महामार्गावरील या चौकाला मुंडे साहेबांचे नाव मिळाल्याने,केज शहराच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे.



