
केज/प्रतिनिधी
दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती केज येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जीपीडीपी आराखडा २०२६-२७ साठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले.यामध्ये कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.चौरे सर विस्तार अधिकारी (पंचायत) व संवाद श्री.रोडेवाड सर विस्तार अधिकारी (पंचायत) ,श्री.मस्के सर विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी केले.
तसेच संपुर्ण मार्गदर्शन श्री.धाकपाडे सर व श्री. पिंपरीकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विठ्ठल नागरगोजे सर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण टीएमपी पोर्टल वर माहिती भरण्याचे काम श्री.शेख सर,श्री. सरवदे.एस.व्ही.(बीएम) व अरुण बनसोडे (लेखा सहायक )यांनी केले. अशाप्रकारे एक दिवसाची कार्यशाळा अतिशय आनंदात पार पडली.



