सामाजिक

केज शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन व विजया दशमी उत्सव उत्साहात साजरा.

केज/प्रतिनिधी

दि.१२ ऑक्टोंबर २०२५ रविवार रोजी केज शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष,विजया दशमी उत्सवा निमित्त सवाद्य पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्याने स्वयंसेवकात अधिक उत्साह होता.स्वामी विवेकानंद शाळा धारूर रोड ते मंगळवार पेठ रोड, आंबेडकर चौक, साठे चौक,भगवान बाबा चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर कानडी रोड, वकील वाडी सह पूर्ण शहरांमध्ये पथसंचलन करण्यात आले.

शहर, तालुक्यातील संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिस्तबद्ध रीतीने ढोल,घोष,झांजाच्या तालावर,गणवेशात लाठ्या काठ्या हातात घेऊन स्वयंसेवकानी पथसंचलन करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.केज शहरातून मिरवणूक चालू असताना नागरिकांनी व महिलांनी स्वयंसेवकावर फुलांची उधळण केली,जागोजागी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती.

पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती,प्रथम संघाचा ध्वज शाखेतफडकवण्यात आला,व प्रार्थना घेण्यात आली,समारोप वकील वाडी हनुमान मंदिर येथे संघाचे सर संघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अनेक उपस्थित मान्यवरांनी संघाचे विचार मांडले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, स्थापना, संघाच्या कामाचे महत्त्व, पटवून दिले.कार्यक्रमाचा शेवट झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.तसेच पथ संचलनात सहभागी स्वयंसेवकांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक ,महिला ,पुरुष, लहान मुले ,मोठ्या संख्येने पथ संचलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!