वकील संघ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत एक दिवसीय प्रादेशिक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी
दिनांक 25 जुलै 2025 रोजी वकील संघ उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत एक दिवसीय प्रादेशिक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम वकील संघाच्या वतीने घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन वकीलसंघाच्या अध्यक्षा अॕड.सौ.योगिता क्षीरसागर (थोरात) मॅडम,उपाध्यक्ष अॕड. एस.एन.मोरमपल्ले
सचिव अॕड.श्रीकृष्ण चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी.डी.एस.एल.आय.पी.एफ अधिकारी स्नेहल पलांडे यांनी उपस्थित विधीज्ञ यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विधीज्ञ यांना सेबी तसेच सी.डी. एस.एल.चीकार्यप्रणाली विशद केली तसेचबचत व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. डिमॅट अकाउंट,शेअर मार्केट,म्युच्युअल फंड व आॕनलाईन फ्राॕड पासुन सावधगिरी बाळगावी यासाठी मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना सर्वांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधीज्ञ मंडळी यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले.या कार्यक्रमास जेष्ठ विधीज्ञ व्हि.डी.सोळंके
मा.अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॕण्ड गोवा वरीष्ठविधीज्ञ व्हि.डी.सपकाळ साहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सेबीचे सेक्युरीटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी यांनी केले.


