सामाजिक

पत्रकार रंजीत घाडगे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाच्या वतीने सत्कार संपन्न,पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गौरव

केज/प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार रंजीत घाडगे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आर.पी.आय.तालुकाध्यक्ष दीपक कांबळे,सरचिटणीस गौतम बचुटे,जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे,नाना गायकवाड,आय.टी.सेल तालुकाध्यक्ष सुरज काळे,तालुका उपाध्यक्ष प्रशांत हजारे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास पत्रकार सचिन भालेराव, पत्रकार प्रदीप गायकवाड,उत्कर्ष काळे,विनोद गायकवाड,अनंता काळे,तुपारे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौतम बचुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे यांनी केले व मनोगत तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी व्यक्त केले.या सत्कार सोहळ्यात वक्त्यांनी रंजीत घाडगे यांच्या पत्रकारितेतील कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!