डॉक्टरांवरच अन्याय का? खा.बजरंग सोनवणेंनी उठविला संसदेत आवाज आठ तासाची ड्यूटी देण्याबाबत मागणी

बीड/प्रतिनिधी
देशातील पीजी रेसिडेंट डॉक्टरांना ३६ ते ४८ तास सलग,कोणत्याही विश्रांती शिवाय काम करायला लावले जात आहे.इतर क्षेत्रात आठ ते बारा तास काम करण्याचे नियम आहेत मग हा नियम डॉक्टरांनाच का लागू नाहीत ? हा सरळ सरळ अमानवी अत्याचार आहे, यामुळे डॉक्टरांच्या ड्यूटी च्या वेळेत बदल करावा, अशी आग्रही मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात खा.बजरंग सोनवणे यांनी डॉक्टरांच्या ड्यूटीच्या वेळे बद्दलचा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशातील पीजी रेसिडेंट डॉक्टरांना ३६ ते ४८ तास सलग, कोणत्याही विश्रांती शिवाय काम करायला लावले जाते आहे.मुळात असे काम केल्यास डॉक्टरांवर ताण तणाव निर्माण होते.इतर क्षेत्रात आठ ते दहा तास कामाची वेळ आहे,मगडॉक्टरांनाच ३६ ते ४८ तास काम का करावे लागते.
आरोग्य व्यवस्थेचे आधारस्तंभ असलेल्या डॉक्टरांवर असे क्रूर वेळापत्रक का?, झोपेचा अभाव,थकवा, सततचा ताण,या अवस्थेत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना आणि रुग्णांना दोघांनाही धोका निर्माण होतो.यामुळे सलग ३६ ते ४८ तासांच्या ड्यूटी तात्काळ बंद कराव्यात,८ तासांच्या मानवी आणि वैज्ञानिक कामाच्यामर्यादा लागू कराव्यात,हे कर्तव्य निष्ठेचे परीक्षण नाही तर हा अन्याय आहे,आणि तो आता थांबायलाच हवा. आपण सर्वांनी मिळून तरुण डॉक्टरांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले.



