सामाजिक

अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ ; केज पंचायतसमिती कार्यालया समोर वाघमारे कुटुंबाचे बेमुदत उपोषण!

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील विडा येथील अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास केज तालुक्यातील विडा ग्रामपंचायतचे सरपंच सातत्याने टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ एका महिलेने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचीनोटीस दिली आहे.उपोषणकर्त्या सौ.अंजली संतोष वाघमारे या दिनांक १० डिसेंबर २०२५ बुधवार पासून आपल्या कुटुंबियांसमवेत बेमुदत उपोषणास बसलेल्या आहेत.

सौ.अंजली संतोष वाघमारे मु.पो.विडा,ता. केज,जि.बीड येथील रहिवासी आहेत.त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मयत सासूच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्यावे,अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी मा.सरपंच यांनी कुटुंबातील सागर दादाराव वाघमारे यांना घेणार नाही,मात्र त्यांच्या ऐवजी सौ.अंजली संतोष वाघमारे यांना मयत सासूच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर घेतो असे सांगितले होते.

सरपंचांच्या सूचनेनुसार,कुटुंबाने वारसा बाबतचे संमतीपत्र देखील ग्रामपंचायतकडे सादर केले आहे. अर्जदाराने गटविकास अधिकारी,पंचायतसमिती,केज यांना दिलेल्या उपोषण नोटीसीमध्ये त्यांच्या कार्यालयाचे पत्र क्र.1239 दि.13 मे2025 आणि शासन निर्णय दि. 02/05/2025 चा संदर्भ दिला आहे.अर्जदाराच्या म्हणण्यानुसार,ग्रामपंचायत कर्मचारी हा अल्पवेतनी असल्यामुळे त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी अनुकंपा तत्त्वाचे शासन निर्णय पारित करण्यात आले आहेत. मात्र,विडा गावचे सरपंच साहेब या शासन निर्णयाची पायमल्ली करत आहेत आणि अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहेत.

आर्थिक परिस्थितीनाजूक

अर्जदार अनुसूचित जाती पैकी असून, त्यांची आर्थिक परिस्थितीही नाजूक आहे.त्यामुळे सदर शासन निर्णयाच्या अंमल बजावणीसाठी आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी पंचायत समिती,केज कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जदार सौ.अंजली संतोष वाघमारे यांनी आपल्या निवेदनाची प्रत माहितीस्तव पुढील कार्यालयांना सादर केली आहेत.मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.बीड,मा. सरपंच/ग्रामसेवक,ग्रा.पं. कार्यालय,विडा ता.केज, मा.पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन,केज,मा. नामदेव चव्हाण, चिटणीस,म.रा.ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!