सामाजिक

विष्णू घुलेंचे समाजकार्य मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत – मा.खा.डॉ. प्रीतमताई मुंडे येवता येथे लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन

केज/प्रतिनिधी

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर तळागाळातील लोकांचा विचार केला.गरजूंनामदत करणे आणि समाजासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. विष्णू घुले यांनी राबवलेले समाजकार्य हेच मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत आहे,असे प्रतिपादन भाजप नेत्या माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केले.

केज तालुक्यातील येवता येथे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दि.११ डिसेंबर रोजी भाजपचे युवा नेते विष्णू भाऊ घुले यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉ.प्रीतमताई मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सामूहिक अभिवादन तसेच ग्राम देवतेचे दर्शन घेण्यात आले.डॉ.प्रीतमताई मुंडे पुढे म्हणाल्या की,स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वर या भागातील लोकांनी नेहमीच प्रेम केले.त्यांनीही शेवटच्या घटकाचा विचार करून कार्य केले.त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्य भरात विविध उपक्रम राबवले जातात.

पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो कार्यकर्ते लोकाभिमुख कार्यक्रम राबवतात.विष्णू भाऊ घुले यांचा उपक्रमही तितकाच स्तुत्य असून, सभापतीपदाच्या कार्य काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कार्यक्रमाला भाजप नेते संतोष हंगे,माधवराव निर्मळ,माजी सभापती परिमलाताई घुले,संदीप पाटील,भगवान केदार, डॉ.वासुदेव नेहरकर, मुरलीधर ढाकणे,मधुर मुंडे,सुनील हिरवे,जयश्री गदळे यांच्यासह सर्व सरपंच,भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्र संचालन रमेश बिक्कड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी विष्णू भाऊ घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.तसेच येवता जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

येवता गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करणार. – विष्णू भाऊ घुले

येवता जिल्हा परिषद गटातील अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.आजपासून येवता जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळां मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे,अशीमाहिती भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!