शैक्षणिकसामाजिक

टाकळी येथील प्राथमिक निवासी आश्रम शाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न 

केज/प्रतिनिधी

प्राथमिक निवासी आश्रम शाळा, टाकळी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.शाळेच्या आवारात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

या प्रसंगी शाळेचे संस्थाचालक श्रीकांत घुले तसेच शिक्षक व कर्मचारी यांनी डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना संविधान, समता,शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून सामाजिक संदेश दिला.कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका,आश्रमशाळेतील मुले-मुली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महापुरुषांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!