
केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे नागरी,ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक,कर्मचारी यांच्याकरिता दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.या प्रशिक्षण वर्गात सहकार परीक्षण केंद्र लातूरचे उपप्राचार्य एस.आर. कोळे,कर सल्लागार तथा प्रमाणित लेखा परीक्षक श्री.रवींद्र सुरशेटे,बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहकार तज्ञ,व्याख्याते श्री.खोडसे सी.ए प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उदगीर कार्यालयाचे जे.एस.चोले मुख्य लिपिक,एम.बी. सुवर्णकार यांनी उपस्थित राहून सहकार कायदा, कर सल्लागार,आदर्श पोटनियम दुरुस्ती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच सहकार तज्ञ व्याख्याते श्री.खोडसे सी.ए प्रमाणित लेखा परीक्षक यांनी ठेवी सुरक्षिता,कर्ज वितरण करत असताना घ्यावयाची दक्षता,101 ची प्रकरणे कायदेशीर कारवाई,कर्ज वसुली, एनपीए,नियामक मंडळ पतसंस्था यांनी निर्गमित केलेल्या एम आय एस ची ऑनलाईन माहिती भरणे, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर चोले साहेब,श्री.रविंद्र सुर शेट्टी,खडसे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन वर्ग संयोजक श्री. एस.आर.कोळे यांनी केले.किसान शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेने कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केले. दरम्यान उदगीरकरांनी प्रमाणित लेखा परीक्षक श्री.सी.ए.खोडसे यांच्या मार्गदर्शनाची व कर्तृत्वाची प्रशंसा करत कौतुकाची थाप दिली.हीचकौतुकाची थाप व प्रशंसा माझ्या पुढील यशस्वी आयुष्या साठी निश्चितच ऊर्जादायी व प्रेरणादायी राहील अशी प्रतिक्रिया प्रमाणित लेखा परीक्षक श्री.सी.ए.खोडसे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



