
केज/प्रतिनिधी
दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी पळसखेडा ग्राम पंचायत कार्यालय येथे भारतसरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच एम. सी.एक्सच्या माध्यमातून ग्रामस्थांना एक दिवसीय स्मार्टनिवेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन सरपंच श्री.वसंत चव्हाण व उपसरपंच श्री.अनुरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एम.सी. एक्सचे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थित उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले. यात त्यांनी महिलांना बचत,आर्थिक नियोजन व त्याचे महत्त्व, डिमॅट अकाउंट,फायनान्शियल मार्केट्स,कमोडिटीचे प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज (सोने,चांदी) यांची मागणी व येणाऱ्या काळात त्यात होणाऱ्या भाव वाढीचे बदल,वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट ,कमोडिटी व इक्विटीमध्ये असलेला फरक, तसेच सेबीच्या सारथी ॲप चे महत्व इत्यादीचे मार्गदर्शन केले.
तसेच गुंतवणूक करत असताना महिलांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लहू मुळे यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले.तसेच या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



