क्रिडासामाजिक

केज शहरातील सिनीयर क्रिकेटपटूंचे स्नेह मिलन, निसर्गाच्या कुशीत रंगला जुन्या आठवणींचा ‘सामना’! 

केज/प्रतिनिधी

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जबरदस्त खेळीने केज शहराची शान वाढवणाऱ्या सिनीयर क्रिकेट खेळाडूंचे एक आगळेवेगळे आणि उत्साहाचे स्नेह मिलन नुकतेच निसर्गाच्या रमणीय सानिध्यात पार पडले.या स्नेह मिलनात केज शहराच्या जुन्या जाणत्या आणि आपल्या काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला,ज्यामुळे एका खास खेळीमेळीच्या वातावरणाची निर्मिती झाली.

स्नेह भोजनाचा आस्वाद व आठवणींना उजाळा हा सोहळा केज शहरातील ज्येष्ठ खेळाडू शेख जफर यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडला.सर्व खेळाडूंनी एकत्र येत स्नेह भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला. विशेषतः क्रिकेटच्या मैदानावरच्या थरारक क्षणांची आणि त्या काळात केलेल्या गमती जमतींची चर्चा रंगली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये जुन्या काळाच्या आठवणींनी समा बांधला.उपस्थित सिनीयर खेळाडू

या स्नेह मिलन उत्सवाला केज शहराचे अनेक नामांकित सिनीयरखेळाडू उपस्थित होते,ज्यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून केज शहराचे नाव मोठे केले आहे. यामध्ये अकबर इनामदार, प्रकाश मुंडे,शेख सिद्दीक भाई,अजिमभाई इनामदार,विजय आरकडे, मनोज मस्के,चांद कादरी, डॉ.शशी केंद्रे,प्रेमजीत हजारे,नय्युम मौजन,बंडू मस्के,विनोद गुंड,ॲड. भागवत ढाकणे,फशी मौजण,शेख जफर,शेख पाशाभाई, शिवाजी घुले, अप्पा हजारे,प्रशांत जाधव,नय्युम मौजन, ताहेर मुल्लासाब, मुजफ्फर सय्यद,अंकुश राऊत,रवि औटी,शेख खय्युम यांच्यासह अनेक जुने जाणते व उत्कृष्ट खेळाडू हजर होते.या सर्व सिनीयर क्रिकेटखेळाडूंनी एकमेकांचे अलीकडील जीवनमान आणि अनुभव जाणून घेतले. भविष्यात अशा प्रकारचे स्नेह मिलन नियमितपणे आयोजित करण्यावरही यावेळी चर्चा झाली,जेणेकरून मैदाना बाहेरील हे खास नाते अधिक दृढ होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!