सामाजिक

पदवीधर मतदार संघा मध्ये नाव नोंदणी करण्या साठी शेवटचे काही दिवस पदवीधरांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी -प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

पदवीधर मतदार संघा मध्ये एकूण 2 लाख 40 हजार मतदाराची नोंदणी झालेली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघा साठी नव्याने मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे.

सदर सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीच्या प्रारूप प्रसिद्धीचा दिनांक 3 डिसेंबर होता त्यानुसार प्रारूप मतदार यादी आता प्रसिद्ध करण्यात आली विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यक्रमाच्या वेळी विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद विभागीय पदवीधरमतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर,अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी श्रीमती मंजुषा मित्तकर यांच्या सह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 62, 318 मतदार नोंद झालेली आहे.

जालना जिल्हा 28,922,परभणी जिल्हा 20,700,नांदेड जिल्ह्यात 30,135,लातूर जिल्ह्यात 22,487, धाराशिव जिल्ह्यात 20,809 बीड जिल्ह्यात 47 हजार 174मतदारांची नोंदणी झालेली आहे.या विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 2,40,549 पदवीधरांची नोंदणी झालेली आहे या पुढील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे दावे व हरकती स्वीकारण्याचा आहे.त्याचा कालावधी निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025 असा निश्चित केलेला आहे या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व हरकती दावे दिनांक 5 जानेवारी 2026 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत.

तरी सर्व पदवीधर मतदार संघातील मतदारांनी आपला मतदार यादीतील क्रमांक आपले नाव बरोबर आहे याची खात्री करावी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी होणार आहे तरी मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आल्याची खात्री करून घ्यावी व नसेल तर राहिलेल्या पदवीधरांनी म्हणून पाच दिवसांमध्ये आपली मतदान नोंदणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेची संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!