अध्यात्मिक
कोल्हेवाडी येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात संपन्न.

केज/ प्रतिनिधी
दि.०४ डिसेंबर २०२५ मौजे कोल्हेवाडी ता.केज जि.बीड येथील हनुमान नगर येथे गेली पंधरा वर्षा पासून दत्त जयंती सोहळ्याची परंपरा मिसाळ परिवाराच्या वतीने चालू आहे.याही वर्षी श्री.ह.भ.प.महंत श्रीराम महाराज विडेकर यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली.श्री दत्तात्रेय यांच्या जन्म सोहळ्यावर उत्कृष्ट अशी कीर्तन रुपी सेवा भाविक भक्तांना श्रवण करण्याचा योग लागला. यासोहळ्याला कोल्हेवाडी व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मिसाळ परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.



