ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुकाध्यक्ष समाधान बचूटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान बचूटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे समाधान बचूटे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला बहुजन समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते लिंबराज गायकवाड, बालासाहेब जोगदंड, बहुजन नेते अशोक गायकवाड,तसेच पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित पत्रकार सचिन भालेराव,रणजित घाडगे, पांडुरंग कसबे,प्रदीप गायकवाड आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.
या सोबतच वैभव कसबे, दत्ता गायकवाड सर या कार्यकर्त्यांनीही समाधान बचूटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात समाधान बचूटे यांनी उपस्थितांचे आभार मानत समाजाच्या हक्क,अधिकार आणि न्यायासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमा दरम्यान शाल व पुष्पगुच्छदेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आणि समाजातील बांधिलकी जपण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.



