स्वानंद सार्वजनिक वाचनालयात संत रोहीदास पुण्यतिथी, महात्मा फुले पुण्यतिथी, जागतिक एड्स दिन, जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमाने साजरे

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संत रोहिदास पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली.सर्वप्रथम संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी रमेशराव गायकवाड, अक्षरा सौदागर, जयंत सौदागर,नारायण गायकवाड,भगीरथ भोसले,समिक्षा शिंदे, बाळासाहेब गायकवाड, बबन पुंड,अरुण गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड, ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांचीउपस्थिती होती.
दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. विठ्ठल गायकवाड,लहु सोनवणे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड,आनंद भैय्या गायकवाड,नारायणभाऊ गायकवाड,रमेश आबा गायकवाड,रामराजे अण्णा गायकवाड,बबन पुंड, छगननाना गायकवाड, सोमेश्वर शिंदे,बाळासाहेब गायकवाड,अक्षरा सौदागर,जयंत सौदागर, रावसाहेब जाधव यांची उपस्थिती होती.
दि.१ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक एड्स दिन व गीता जयंती साजरी करण्यात आली.यावेळी रावसाहेब गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड, माजी ग्राम पंचायत सदस्य रमेशराव गायकवाड,जयंत सौदागर,ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनीजागतिक एड्स दिन व गीता जयंती विषयी सविस्तर विवेचन केले.
दि.३डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन कार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला.या कार्य शाळेत डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनीशासकीय धोरण व प्रत्यक्षात धोरण राबविण्याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष,सर्व समावेशक शिक्षणातील आव्हाने,रोजगाराचा प्रश्न, सुलभ सुविधेचा अभाव, प्रत्यक्ष मदतीचा अभाव याविषयी मार्गदर्शन केले.
शासकीय योजनात १) सुगम भारत अभियान, डीआयपी, एनएचएकडीसी,कृत्रीम अवयव,व्हिल चेअर इत्यादी.पण प्रत्यक्षात शासनाची प्रभावी अंमल बजावणी नाही,डिजीटल प्लॉट फॉर्म या सुविधा मिळणे दुरापास्त आहे.खऱ्या अर्थाने दिव्यांग व्यक्तींना सहानुभुतीची नाही तर समानतेची गरज आहे, आजही समाजात दिव्यांग व्यक्तींशी दुजाभाव केला जातो हे अतिशय समाज विघातक आहे.
दिव्यांगांना माणुस म्हणून सन्मानाची वागणूक समाजात मिळायला पाहिजे अशी अपेक्षा व भावना डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच रामराजे गायकवाड,रमेश आबा गायकवाड,रावसाहेब गायकवाड, रावसाहेब जाधव,नारायण गायकवाड यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



