चि.देवव्रत रेखे याने दण्डक्रम विक्रमादित्य उपाधी मिळविल्या बद्दल ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने शुभकामना .

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे भूषण असलेले अहिल्यानगरचे वेदमूर्ती चि.देवव्रत महेश रेखे यांनी अवघ्या 19 व्या वर्षी श्री क्षेत्र काशी येथे ५० दिवसांत १६५ तासा पेक्षा अधिक काळअखंड, अत्यंत कठीण आणि मन:शक्तीची सर्वोच्च परीक्षा पाहणाऱ्या ‘दण्डक्रम’ साधनेचे यशस्वी पारायण करून ‘दण्डक्रम विक्रमादित्य’ ही प्रतिष्ठेची उपाधी प्राप्त केली आहे.
या अलौकिक व अद्भुत कार्याच्या या मानाच्या पदवीस पात्र ठरल्याबद्दल महाराष्ट्राचे सुपुत्र,वेदमूर्ती चि.देवव्रत महेश रेखे यांचे ब्राह्मण संघर्ष समितीचे धनंजय कुलकर्णी,श्रीनिवास केजकर,चंद्रकांत पाटील, श्रीधर खोत,शिवराज मुथळे, गजानन औसेकर, श्रीराम शेटे,प्रविण देशपांडे,समीर देशपांडे यांच्यासह केज तालुक्यातील ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन केले आहे.
वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो यासाठी मासिक ब्राह्मण संघटन तसेच समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.



