सामाजिकसाहित्यिक

वाचनाने मस्तक सशक्त होते ; सशक्त मस्त कोणापुढेही नतमस्तक होत नाही.वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 42 व्या केंद्राचा प्रारंभ व अभिवादन ग्रुप तर्फे शालेय साहित्य वाटप 

बीड/प्रतिनिधी

पालकांनी आजच्या मोबाईल इंटरनेटच्या मायावी जगात लहानपणीच जर चांगली पुस्तके मुलांच्या हाती दिली तर त्यांना साने गुरुजी,रवींद्रनाथ टागोर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद व आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर भगतसिंग,राजगुरू व सुखदेव तसेच स्वातंत्र्या करिता काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवन चरित्र पुस्तके आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची पुस्तके जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागेल व सुजान नागरिक बनुन स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायाची प्रबळ भावना जागृत होऊन आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना पक्की रुजून आपल्या सर्वांचे कल्याण होईल अशी डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही कल्याणकारी राज्य “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” निर्माण होण्याकरिता हिंसेच्या मार्गाने न जाता कोणताही अडथळा येणार नाही हा आशावाद महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले यांनी वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाच्या 42 व्या केंद्राचे अंकुश नगर बीड येथे उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.

वाचनाने मस्तक सशक्त होते व सशक्त मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही हा महामानवांच्या महान उपद्देशाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.योगेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित मदर टेरेसा बालकाश्रम अंकुश नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप यांनीगरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य(वही,पेन) वाटप कार्यक्रम प्रसंगी वस्तीगृहाचे संचालक मा. बालाजी जाधव अध्यक्षपदी तर प्रा. गजानन चित्रे,जी.एम. भोले व मुख्याध्यापिका वैशाली शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते .

तर वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी.वानखेडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले,काशिनाथ वाघमारे एएसआय अशोक ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.राऊत यांनी तर प्रास्ताविक प्रा.अशोक गायकवाड यांनी केले. सर्वप्रथम क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.जी.एम.भोले यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले.

वाचनालयाचे उद्घाटन प्रसंगी डी.जी.वानखेडे यांनी फिरते मोफत वाचनालयाची कार्यप्रणाली समजावून सांगितली.व या संचातील सर्व पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी असे नम्र आवाहन केले. व दोन महिन्यानंतर नवीन 60 पुस्तकाच्या संच वितरित केल्या जाईल.पहिल्या संचातील पुस्तकावर आधारित स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुस्तक रूपात बक्षीस दिल्या जाईल असे स्पष्ट केले.

पुस्तक वितरणाची जबाबदारी प्रा.गजानन चित्रे यांनी स्वंयस्फूर्तपणे स्वीकारली.प्रा.अशोक गायकवाड यांनी त्यांच्या प्रियदर्शी वाचनालयातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्याचे जाहीर केले.महामानव अभिवादन ग्रुपने उपस्थित 36 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य (वही,पेन) वाटप केले.मुख्याध्यापिका वैशाली शिंदे यांनी शिक्षण व वाचनाबद्दल मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात अध्यक्षांनी वाड्या वस्ती तील व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाकरिता सेवाभावी संस्था करीत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या कडून प्रेरणा घेऊन त्यांनी केलेल्या महान कार्याचा खारीचा वाटा उचलण्याचे कार्य करीत आहे हे स्पष्ट केले.बार्टीचे समन्वयक भीमराव खंडारे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.मुलांना आयुष्यमती वैशाली शिंदे यांनी अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!