
बीड/ प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन 4000 रुपये भाव जाहीर करावा वाढती महागाई त्याच बरोबर इतरही शेतीसाठी लागणारा खर्च यामुळे उसाचा भावही वाढला पाहिजे अशी मागणी बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे शेतकऱ्यांना आपल्या ऊसाला भाव जोपर्यंत शेतकरी स्वतः साठी स्वतः रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत कुठेही ठोस भूमिका कोणताही कारखाना शासन प्रशासन घेणार नाही.
कारखानदाराची कुठपर्यंत वाहवा करायची आणि कारखानदाराचे लाडही शासनाने केले नाही पाहिजेत उसापासून विविध उपपदार्थ तयार होतात कारखानदारांना ऊस गाळप करताना चांगला फायदा होतो तरी देखील कारखानदारांना शेतकऱ्यांना योग्य भाव देत देता येत नाही साखर 4000 रुपयापेक्षा जास्त विक्री होते आणि ऊसाला तीन हजाराच्या आतच भाव दिला जातो म्हणजे किती तफावत आहे.
मराठवाड्यातला शेतकरी आधीच आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेला आहे कारण मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ऊसच नाही तर मराठवाड्यात प्रत्येक पीक धोक्यात आले होते त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे मराठवाड्यात तितके उसाचे क्षेत्र नाही पण जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत निदान त्यांना ऊस लावायला तरी परवडला
पाहिजे त्यासाठी मराठवाड्यात जितके सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत त्या कारखान्यांनी 4000 रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला पाहिजे हे तर नक्कीच सत्य आहे कायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो ज्या प्रमाणात कापूस,सोयाबीन या पिकाला भाव नाही त्याच प्रमाणात ऊसाला देखील योग्य भाव मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी देखील कर्जाच्या विळख्यात सापडलाय याला कर्जमुक्त करायचे असेल तर ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे पहिल्यांदा ऊस लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि त्यानंतर उसातून जे काही उत्पन्न निघेल त्यावर समाधान मानावे लागते .
आज वातावरण बदलामुळे उसाचे उत्पादन देखील कमी झालेलं आहे उसाचे उत्पादन एकरी मराठवाड्यात 30 ते 40 टनापर्यंत निघत आहे इतर ठिकाणी जास्त उत्पादन निघत असेल परंतु मराठवाड्यात उत्पादन कमी निघत आहे आणि उत्पादन कमी निघाल्या मुळे ऊस खर्चाला परवडत नाही. कारखानदार ही योग्य भाव देत नाहीत त्यामुळे ऊस उत्पादक देखील अडचणीत सापडले आहेत .
माजलगाव येथील शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका पूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे राज्यातले सर्व साखर कारखाने बंद राहू शकतात एकदा का कारखाने बंद राहिले की शासनाला आणि कारखानदारांना जाग येऊ शकते शासनाला जाग आणण्यासाठी मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी एकजूट करून उसाच्याभावासाठी ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे असे प्रतिपादन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केले आहे.



