
केज/प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येला तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यांना ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या अमृततुल्य अशा किर्तनरुपी सेवेतुन अभिवादन करण्यात आले तसेच अभिवादन करण्यासाठी या पार्श्वभूमी वर आज संघर्ष योध्दा मनोज पाटील,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,मा.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले,तसेच जिल्ह्यातील आमदार,खासदार, समाजसेवक, राजकीय नेते मंडळी,सर्वांनी मस्साजोग येथे येऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची विचारपूस केली.हत्येला एक वर्ष झाले,तरी अजून आम्हाला न्याय मिळाला नाही,अशी खंत वैभवी देशमुख हिने व्यक्त केली. तर गावकऱ्यांनी देखील न्यायाची मागणी केली. गत वर्षी 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती.मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती.या प्रकरणात सत्ताधारी आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.मात्र घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले. तरीही न्यायालयात अजून आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत,तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे.
त्यामुळे देशमुख कुटुंब आजही न्यायासाठी संघर्ष करत आहे.यावेळी संतोष देशमुखांची लेक वैभवी हिने सर्वांसमोर आपली व्यथा मांडली.मी शिक्षणासाठी दुसऱ्या गावी गेली असली,तरी माझे अर्ध लक्ष घरीच असते,असे ती म्हणाली. बाबांना जाऊन वर्ष होत आले,तरीअद्याप आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद कुठूनच भेटत नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही,असे वैभवी देशमुख म्हणाली. अण्णावर जीवापार प्रेम करायचो दरम्यान,आज सकाळी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना भावाच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. आपल्या भावाला जाऊन वर्ष झाले तरीही आम्हाला न्याय मिळत नाही.माझे माझ्या भावावर जीवापाड प्रेम होते,कर्ता माणूसच घरातून गेला आता आमचे कसे होणार?”आमचा निष्पाप माणूस या क्रूरकर्मी लोकांनी कायमचा हिरावून नेला. आमचे हसते-खेळते कुटुंब दृष्ट लागल्यासारखे उध्वस्त झाले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संतोष यांची कन्या वैभवी हिने काका धनंजय यांचे सांत्वन करत त्यांचे अश्रू पुसले.हे दृश्य पाहून उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले.
वडिलांना न्याय मिळावा – वैभवी देशमुख
बाबा जाऊन एक वर्ष झाले.अजूनही त्यातील एका आरोपीला अटक झालेली नाही.माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी वैभवीने सरकारकडे केली आहे.



