वाणिज्य

महावितरण विभाग केजच्या बिल वसुलीचा आदर्श घेत केज ग्रामीण विभाग 2 ची 92 टक्के विजयी वसुली अधिकारी कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या केज ग्रामीण पथक 2 यांच्याकडे जुलै 2025 साठी विज बिल वसुली चे 32 लाखांचे उद्दिष्ट होते.अथक प्रयत्नांमुळे विभागाने 29 लाख रुपये विज बिल वसूल करून 92 टक्के वसुली चा टप्पा गाठला आहे.

या उल्लेखनीय यशाचे श्रेय उप कार्यकारी अभियंता सय्यद मिनाजोदीन यांच्या प्रभावी मार्गदर्शनाला जात आहे,तसेच सहाय्यक अभियंता बोराटे मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन करत हे उद्दिष्ट जवळपास गाठले.यशस्वी वसुली मध्ये योगदान देणारे कर्मचारी गोपाळ मुंडे, आदिनाथ मुंडे,गजानन पांचाळ,संतोष कराड, प्रवीण सांगळे,राम सोळंके,अशोक वैरागे, राजाभाऊ राठोड, सतीष तांदळे या सर्वांनी संघ भावनेने मेहनत घेतली.उप कार्यकारी अभियंता सय्यद साहेब व मुख्य तंत्रज्ञ विष्णु तेलंग यांनी सर्व टीमचे अभिनंदन करत त्यांच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.विज बिल वसुलीत केज ग्रामीण-2 हे आदर्श ठरले असल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!