सामाजिक

बीड शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्या संदर्भात साऊ एकल महिला समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बीड/प्रतिनिधी

ग्रामीण भागातील ग्राम पंचायत स्तरावर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व इतर एकल महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने केले आहे.त्याच धर्तीवर बीड शहरातील एकल महिलांचेही सर्वेक्षण करून त्यांना रोजगार व स्वावलंबनासाठी मदत करावी,अशी मागणी साऊ एकल महिला समिती,महाराष्ट्र राज्य, बीड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली.

या मागणी संदर्भात समितीचे मार्गदर्शक प्राचार्य डी.जी.तांदळे, जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे व डॉ. संजय तांदळे यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी शहरातील अनेक एकल महिला आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित महिलांना रोजगार मेळावे,कौशल्य विकास प्रशिक्षण,बचत गट,उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देता येऊ शकतो.

महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरेल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाच्या २९ मार्च २०२२ च्या निर्णया नुसार महिला व बाल कल्याणासाठी निधी खर्च करण्याची तरतूद आहे. त्यातील काही निधी एकल महिलांच्या रोजगार, व्यवसाय आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यातयावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.बीड शहरातील झोपडपट्ट्या व विविध परिसरांतील गरजू एकल महिलांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे,यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!