
बीड/प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील घटनेतील नराधमास फाशी देण्यात यावी यासंदर्भात धर्मवीर छावा संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आले डोंगराळे गावातील तीन वर्षे चिमुकलीची बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
या घटनेचे पडसाद सर्व महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात उमटले आहेत.त्यामुळे बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरी आपण शासन दरबारी योग्य ते कारवाई करून संबंधित नराधमास फाशी शिक्षा देण्यात यावी.
निवेदन देताना धर्मवीर छावा संघटनेचे जालना जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर घनसावंगी तालुकाध्यक्ष दत्ता शिंदे व वजीर शेख उपस्थिती होते, तसेच धर्मवीर छावा संघटना बीड यांच्या वतीने बीड जिल्हा निवासी उप जिल्हाधिकारी पोलिस स्टेशन येथे मालेगाव येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या साठी निवेदन देण्यात आले.
बीड जिल्हा धर्मवीर छावा संघटनेचे ग्रामिण जिल्हा प्रमुख कु.खेमाडे कावेरी ताई बाळू तसेच आम्रपालीताई साबळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे.



