
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्ल भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष तथा भारतीय संविधान दिन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन,ग्रंथ प्रदर्शन,व्याख्यान, कथाकथन इत्यादी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले.
सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड,जयंत सौदागर यांनी केले.
ग्रंथवाचन यशवंत सौदागर,अक्षरा सौदागर,बबन पुंड,आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष या विषयावर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात सर्वसमावेशक संविधान भारत देशाला देवून स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामजिक न्याय दिला असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी ह.भ.प.नारायण भाऊ गायकवाड हे होते. सकाळी ९ ते ५ पर्यंत ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.



