सामाजिक

चिंचोली माळी येथे रोहन गलांडे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

केज / प्रतिनिधी

चिंचोली माळी ता.केज येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत.

चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) ते संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे,अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.तसेच केज तालुक्यातील विहीर, गायगोठा व घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत,अशी मागणीही उपोषणातून करण्यात आली आहे.

या सोबतच चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीतील नामदेव महाराज परिसरातील अतिक्रमण हटविणे,येथील कर्मवीर विद्यालयाच्या २००५ ते २०२५ या कालावधीतील निवेदनांवरील मागण्यांची चौकशी करून कार्यवाही करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकाम व पुनर्विकासासाठी २०१५ ते २०२५ या कालावधीत प्राप्त व खर्च झालेल्या निधीची माहिती देऊन चौकशी करणे, महाडीबीटी अनुदानाचे प्रलंबित लाभ शेतकऱ्यांना तात्काळ देणे,गायरान परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दि.११ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सादर केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात, तसेच चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे,या मागण्यांसाठीच हे आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे रोहन गलांडे यांनी सांगितले आहे.मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण सुरूच राहील,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!