प्रशासकीयसामाजिक

केज तालुक्यातील सर्व राशन दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यात किडे ,अळ्या आढळून आल्यामुळे केज तहसीलदारांना आझाद क्रांती सेनेच्या वतीने निवेदन 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील सर्व राशन दुकानावर शासना कडून मंजूर अन्नधान्य वितरण योजनेअंतर्गत ज्वारीचे धान्य मिळते. मात्र,सर्वच ठिकाणी आझाद क्रांती सेनेच्या वतीने केज शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली असता त्यामध्ये जाळी, जाळे,किडे,अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.

असे निकृष्ट व अस्वच्छ धान्य ग्राहकांना देणे अत्यंत गैरप्रकार असून यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.याची जाणीव आझाद क्रांती सेनेचे तालुकाप्रमुख शरद थोरात,तालुका उपप्रमुख अनिल लोखंडे तसेच शहरप्रमुख इरफान पठाण व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांनी निवेदनाच्या माध्यमातून केज तहसीलदारांना करून देण्यात आली.

क्रांतीनगर भागातील एक वयोवृद्ध महिला राशन आणण्यासाठी गेली असता तिला अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य देण्यात आले.असे धान्य माणूस तर सोडा जनावरे पण खाणार नाहीत अशी परिस्थिती आहे.त्या महिलेला क्रांती नगर येथून जाण्या येण्यासाठी १०० रू देऊन ऑटोरिक्षा करून दुसऱ्या भागात राशन दुकान असल्यामुळे जावे लागत आहे.एवढे रुपये खर्च करून देखील त्या ग्राहक महिलेच्या पदरात असे किडलेले, जाळ्या,अळ्या झालेले धान्य पडत असेल तर ही कुठली व्यवस्था आहे.

क्रांतीनगर येथील मंजुर असलेले स्वस्त धान्य दुकाना संदर्भात ह्या पुर्वी पण अनेक वेळा निवेदन देण्यात आलेले आहे पण अध्याप दुकान क्र.14 हे क्रांतीनगर भागात स्थलांतरित झालेले नाही. क्रांतीनगर भागातील स्वस्त धान्य दुकान क्रांतीनगर मध्ये स्थलांतरित करण्यात यावे यासंदर्भात केजचे तहसीलदार राजेश गिड्डे हे लवकरात लवकर समाधानकारक उत्तर देऊन कार्यवाही करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!