युवा श्रमिकांच्या हक्कांसाठी बीजेएमएसची मोठी पुढाकार शांतप्रकाश जाटव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महासचिव चरणसिंह यांचे नेतृत्व

दिल्ली/प्रतिनिधी
देशभरातील युवा श्रमिकांसाठी समान वेतन, वेळेवर पगार, सुरक्षित कार्यस्थळ, सामाजिक सुरक्षा आणि नोकरीच्या सुरुवातीला अनिवार्य नियुक्तीपत्र (Appointment Letter) मिळावे, यासाठी भारतीय जनता मजदूर संघाने मोठी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शांतप्रकाश जाटव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय महासचिव चरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला गती मिळत आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात युवा श्रमिकांच्या हक्कांवर, रोजगारातील पारदर्शकतेवर आणि भविष्याच्या सुरक्षेवर व्यापक चर्चा झाली. यावेळी युवा मोर्चा, मंडल दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष तसेच बीजेएमएस सोशल मीडिया आणि डिजिटल क्रिएटर्स बोर्डचे राष्ट्रीय सचिव रौशन कुमार यांनी युवा श्रमिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकत संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब लक्ष्मण घोडके यांनी युवा संघटनांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रासह विविध राज्यांत युवकांना संघटित करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य ते सातत्याने करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी आणि मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील हेही युवकांना संघटित करण्याचे कार्य सक्रियपणे करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला.
बैठकीत भोपालसह अनेक भागांत युवा वर्गासाठी कौशल्य विकास, डिजिटल प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीच्या नव्या संधींबाबतही सविस्तर चर्चा झाली.
केंद्रातील मोदी सरकारने आधीच ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्ट-अप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘ई-श्रम कार्ड योजना’ आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून युवा व श्रमिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याच धर्तीवर बीजेएमएस च्या वतीनेही श्रमिकांचे हक्क, सन्मान आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्यात येत आहेत.
युवकांच्या भूमिकेवर बोलताना रौशन कुमार म्हणाले, “युवा सुरक्षित व सशक्त असेल, तेव्हाच देशाचे भविष्य भक्कम होईल. प्रत्येक श्रमिकाला त्याचा हक्क, सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे.”या संपूर्ण चर्चेच्या माध्यमातून युवा श्रमिकांसाठी नव्या आशा, नव्या संधी आणि सकारात्मक बदलांच्या युगाची सुरूवात होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



