साबला येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न,सरपंच जनाबाई नरहरी काकडे, एआरटी संस्था,यवतमाळ अँक्सिस बँक यांच्या वतीने जलपूजन कार्यक्रम संपन्न .

केज/प्रतिनिधी
सरपंच जनाबाई नरहरी काकडे व समस्त साबला येथील नागरिकांच्या विनंतीला मान देऊन एआरटी संस्था,यवतमाळ संस्थापक अध्यक्ष सुहास धस,मन्सुर खोरासी,जल संधारण तज्ञ पवन नखाते, प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी,प्रकल्प सहाय्यक ज्योतीताई सांबरे,प्रकल्प सहाय्यक प्रदिप दहिरे, पोकलेन ऑपरेटर सोनुकुमार चंद्रवंशी, दिलीपकुमार चंद्रवंशी तसेच अँक्सिस बँक प्रतिनिधी यांच्या वतीने साबला येथील नदी पात्राचे दोन हजार मीटर खोलीकरण व रुंदीकरण करुन त्यामध्ये वीस वीस मीटर अंतराचे बॉक्स म्हणजे शोष खड्डे करुन त्यामध्ये प्रत्येक खड्यात वीस फूट खोल बोअरवेल घेण्यात आले आहेत.
त्यामध्ये पावसाचे पडलेले पाणी दुसरीकडे इतर ठिकाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी जमिनी मध्ये मुरले पाहिजे अशा प्रकारचे काम करण्यात आलेले आहे तसेच या वर्षी मे महिण्यात अवकाळी पाऊस पडला आणि साबला शिवारातील व परिसरातील बोअरवेल तसेच विहिरींनाही याचा चांगला फायदा झाला.
जवळ पास एक ते दिड किलो मीटर अंतरावरील बोअरवेल व विहिरींना याचा भरपूर फायदा झाला.या अगोदरच्या काळात म्हणजे अंदाजे वीस बावीस वर्षापासून साबला या गावातील नागरिकांना पाण्याची भिषण टंचाई जाणवत होती.साबला येथील सरपंच जनाबाई नरहरी काकडे व साबला येथील सर्व नागरिकांच्या विनंतीला मान देऊन एआरटी संस्था, यवतमाळ व ॲक्सिस बँक यांच्या माध्यमातुन साबला येथील नागरिकांचा तसेच पशु पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न कमी प्रमाणात झाला आहे.
यावर्षी पाऊसही चांगल्या प्रकारे पडला असल्यामुळे साबला शिवारात पडलेल्या पावसाचे पाणी हे साबला शिवारात आडवल्यामुळे साबला येथीलनागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही.यामुळे साबला गावातील सर्व नागरिक आनंदी झालेले आहेत.
सरपंच जनाबाई नरहरी काकडे ,एआरटी संस्था, यवतमाळ व अँक्सिस बँक प्रतिनिधी,ग्राम पंचायत अधिकारी तानाजी शिंपले यांचे सर्व गावकरी यांनी आभार मानले आहेत.
यावेळी माजी सरपंच मधुकर काकडे,चेअरमन उत्तम काकडे,ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, समाजसेवक नरहरी काकडे,रामराजे शिंदे,दशरथ कटारे, माजी पोलिस उप निरीक्षक उमाशंकर शिंदे, मुख्याध्यापक हनुमंत कटारे,जगन्नाथ काकडे, लक्ष्मण महराज काकडे, गणेश कटारे,रंगनाथ नाईकनवरे,उध्दव नाईकनवरे,बाबुराव कटारे गुलाब मुळे,माऊली नाईकनवरे, राहुल मुळे, लखन राऊत,अंकुश मुळे, भैरू नखाते,सुर्यभान सरवदे,अशोक रोकडे, संदिपान सरवदे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला.



