
केज/प्रतिनिधी
साने गुरुजी निवासी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यां साठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात अँड. उद्धवराव कराड यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, मद्यपान यांसह सर्व प्रकारच्या व्यसनांच्या दुष्परिणामां बाबत मार्गदर्शन करत नशामुक्त राहण्याचे आवाहन केले.
अँड.उद्धवराव कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले की,तरुण पिढी ही देशाची संपत्ती आहे. व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण,कुटुंब आणि भवितव्य सर्वांवर दुष्परिणाम होतात. त्यामुळे तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत नशामुक्त समाज निर्मितीसाठी हातभार लावण्याची प्रतिज्ञा केली.



