
बीड/ प्रतिनिधी
गावची शाळा म्हणजे गावचा आत्मा असतो पुढील पिढ्या निकोप घडवण्याचे माध्यम जिल्हा परिषद शाळा आहे पटसंख्या कमी झाल्यास सरकारी धोरणाचा हातोडा चालून गावात धडधड बंद पाडू नका शाळा गळती थांबवण्याची जिम्मेदारी सरकारची नसून समाजाची नैतिक जबाबदारी आहे.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणेगाव येथे रांगोळी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,शुद्धलेखन स्पर्धा, याचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरण गावचे प्रथम नागरिक सरपंच राम मोराळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बबनराव आंधळे व गावचे सरपंच राम मोराळे सर,अंगद मोराळे,सखाराम आंधळे, राम आंधळे,विष्णू आंधळे बाबासाहेब आंधळे, सुधाकर आंधळे,शिक्षिका सुनीता मोराळे मॅडम व दुसऱ्या शिक्षिका जनाबाई मोराळे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राध्यापक बबनराव आंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या होत्या पुढे बोलताना ते म्हणाले शाळेतील मुलांचे गळतीच प्रमाण चिंतेचा विषय झालेला आहे. समाजाच्या आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून मुलींच्या शिक्षणासाठी सनातनी व्यवस्थेच्या विरोधात अनेक संकटाचा सामना करत सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली आणि आज मुलीच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुलीचे शिक्षणच अडचणीत आले आहे.मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी गावातील वातावरण निर्मिती ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.बाल वयातील हिंसाचार हा चिंतेचाविषय आहे.
अत्याचारापासून बचाव करण्यासाठी त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन करताना ते म्हणाले No Tell and Run म्हणजेच पहिला मुद्दा नो म्हणजे नाही म्हणायला शिका दुसरा मुद्दा Tell आपल्या सोबतच घडलेली घटना आई-वडिलांना शिक्षकांना किंवा आपल्या विश्वासा तील व्यक्तींना सांगा आणि मुद्दा क्रमांक तीन Run जर का तुम्हाला अशी परिस्थिती जाणवते की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुरक्षित नाहीत किंवा कोणी तुमच्याकडे विचित्र नजरेने किंवा विचित्र पद्धतीने वागतोय अशा ठिकाणी तुम्ही थांबायचं नाही त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच निघून जायचं अशा पद्धतीने त्रिसूत्री सांगून चांगला आणि वाईट स्पर्श या विषयी विद्यार्थ्यांना सज्ज करण्यात आले. समाजप्रबोधनाचे विचार मांडण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापक सुनीताताई मोराळे यांनी केले नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



