शैक्षणिकसामाजिक

आपल्या वर्तनातून मुल्य प्रवाहित होतात -डॉ.योगेश सुरवसे

केज/प्रतिनिधी

केज शहरातील साने गुरुजी निवासी विद्यालयात जिल्हाशिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीने मुल्यवर्धित ३.० च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन संपन्न झाले.या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड, प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. देशमुख सर,जयपाल कांबळे सर,मुथा फाउंडेशनचे सचिन सर, गर्जे सर, प्रा. डॉ. कविता कराड मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या टप्प्याच्या अध्यक्ष स्थानावरून श्री. सुरवसे सर बोलताना म्हणाले की,मुलांमध्ये मुल्य ही उपजतच असतात त्यांना वर्धित करण्याच काम आपलं आहे. मुल्य ही प्रत्येकाच्या वर्तनातून प्रवाहित झाली पाहिजेत.प्राचीन काळा पासून मुल्य शिक्षण दिले जाते. यात नैतिक मूल्ये सामाजिक मुल्य अशा विविध मुल्ये ही विद्यार्थ्यांच्या वर्तनातून प्रवाहित झाल्यासच ख-या अर्थाने मुल्यवर्धन झाले असे म्हणता येईल. अन्यथा दुटप्पी पद्धतीचे शिक्षण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

भुदान चळवळीत विनोबा भावे यांनी हजारो हेक्टरजमीन दान दिली हे एक नैतिक मुल्यच होय असे मत त्यांनी व्यक्त केले तर उद्घाटन प्रसंगी अँड. उद्धवराव कराड यांनी विविध उदाहरणे देऊन मुल्यांच्या संवर्धना बरोबर मुल्यवर्धन होणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुथा फाउंडेशनचे सचिन सर यांनी देखील उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे प्रमुख जयस्वाल कांबळे सर यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक ही या प्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अरुण शिंदे सर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.कविता कराड-गित्ते मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!