जयपूरीया मंदिरात ध्यान कार्यक्रम संपन्न; भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री चरणसिंहजी यांची उपस्थिती

मुंबई/प्रतिनिधी
दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी जयपूरिया मधील मंदिरात आयोजित ध्यान कार्यक्रमाला भारतीय जनता मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री व दिल्ली प्रदेश प्रभारी चौधरी चरणसिंहजी यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम भारतीय जनता मजदूर संघाच्या आरोग्य चिंतन व शक्तिकरण मंडळाच्या दिल्ली प्रदेश प्रभारी सुश्री छत्रवती यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीपणे पार पडला.
ध्यान सत्रानंतर आपल्या मनोगतात चौधरी चरणसिंह जी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सुश्री छत्रवती व सर्व आयोजकांचे अभिनंदन केले.तसेच उपस्थित श्रध्दावानांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
भारतीय जनता मजदूर संघाच्या कार्याची वाढती पावले अधोरेखित करत महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके यांनी राष्ट्रीय महामंत्री चरणसिंग जी यांना हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.ध्यान, आरोग्य व संघटन बांधणी यांच्या माध्यमा तून संघाच्या बळकटी करणासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.



