
केज/प्रतिनिधी
देशातील मुलींची पहिली शाळा आयोजित दुसरा आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव २०२६ हा पुणे येथील एस एम जोशी फाउंडेशन सभागृह येथे दिनांक २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या दरम्यान संपन्न होत आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचाप्रसार आणि प्रचार होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींनीमहोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक विजय वडवेवार यांनी केले आहे.
या महोत्सवात कवी संमेलनासाठी केज तालुक्यातील कवी विक्रम डोईफोडे यांची कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.याबद्दल त्यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.



