गेवराई येथे पतसंस्था संचालक,कर्मचारी सहकारी प्रशिक्षण वर्ग संपन्न


बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे चे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर,मा.जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई तालुक्यातील नागरी, ग्रामीण,कर्मचारी पत संस्थेतील संचालक, कर्मचारी यांच्या करिता दि.२३ फेब्रुवारी ते दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय सहकार प्रशिक्षण घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. लक्ष्मीनारायण जी अट्टल चेअरमन जयप्रकाश नागरिक सहकारी संस्था मर्यादित गेवराई,तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री.दीपक पवळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गेवराई यांच्या हस्ते राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले.दोन दिवसीय प्रशिक्षणात पहिल्या सत्रात श्री.पी.ए. कदम सहकार विकास अधिकारी बीड जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड बीड यांनीप्रशिक्षणार्थीची नोंदणी व सहकारी संस्थेचे संचालक, कर्मचारी यांना सहकारी प्रशिक्षणाची गरज,हेतू स्पष्ट सांगितला तसेच मा.श्री दीपकजी पवळ यांनी तालुक्यातील सहकारी संस्थांना सविस्तर मार्गदर्शन करून कायदेशीर बाबीच्या सूचना देण्यात आल्या.त्यानंतर कर्ज वाटप व्यवस्थापन,कर्ज वसुली कलम १०१ मधील तरतुदी,पतसंस्था कामकाजाचे व्यवस्थापन या विषयावर मा.श्री. जयप्रकाश शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुंधरा नागरी सहकारी बँक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
मध्यांतर नंतर बीड जिल्ह्यातील मार्गदर्शक सहकार व्याख्याते तज्ञ मा.श्री. खोडसे सी.ए.प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी ठेवी सुरक्षितता,कर्ज वाटप करताना कायदेशीर बंधने, एनपीए ,थकबाकी दारावर कायदेशीर कार्यवाही ,पतसंस्था लेखापरीक्षण माहिती निकष,पतसंस्था एम. आय.एस.माहिती निकष,अशा विविध विषयावर सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे प्राचार्य बी.जे.ठोंबरे यांनी नियामक मंडळाचे संपूर्ण माहिती,तत्कालीन सहकार कायद्यातील झालेले बदल,नवीन शासकीय परिपत्रक, कायदेशीर बाबी व्यवस्थापन समितीचे कामकाज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री दीपकजी पवळ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गेवराई, मा.श्री. लक्ष्मीनारायण जी अट्टल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन संयोजक श्री.पी. ए.कदम सहकार विकास अधिकारी बीड जिल्हा बोर्ड सहकारी बोर्ड लि. बीड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीरित्या पार पाडण्यात जयप्रकाश नागरी सहकारीपतसंस्था मर्यादित गेवराई यांचे संचालक मंडळ, चेअरमन, सचिव, कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.



