संत सेवालाल महाराज हे थोर सेनानीही होते,त्यांनी स्वातंत्र्य,समता आणि बंधुभावही रुजविला – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड

केज/प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संत व थोर सेनानी सेवालाल महाराज यांची जयंती छोटेखानी बालकांची व्याख्याने घेवून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुगसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.यावेळी कु. ज्ञानेश्वरी पुंड,कु.अंकिता गायकवाड,चि.सोहम गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.
संत सेवालाल महाराज हे संत असण्याबरोबरच थोर सेनानीही होते असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.२५० वर्षापूर्वी त्यांनी स्वातंत्र्य,समता आणि बंधुत्वाची शिकवण समाजाला दिली होती, तसेच दिल्लीचा नवाब गुलाब खान मोहंमद खान याच्याशी लढाईही केली होती व मर्दुमकी गाजवत विजयही मिळवला होता. म्हणून सेवालाल महाराज हे संत असण्याबरोबरच थोर सेनानीही होते असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.



