
बीड/प्रतिनिधी
जीवाला हुरहुर लावणारी घटना घडली आहे डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून हत्या आहे शारीरिक आणि मानसिक छळ होताच याची वेळीच तक्रार देऊन देखील वरिष्ठांना सांगूनही वेळीच तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यामुळे डॉ.संपदा मुंडे यांच्या आयुष्याचा प्रवास संपला भ्रष्ट व मगरुर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने अनेकवेळा मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले आहे.
खासदाराने स्वतःच्या पी ए च्या माध्यमातून रिपोर्ट बदलण्यासाठी प्रचंड दबाव आणून भयानक त्रास दिला या सर्व घटना साखळी पद्धतीने करणाऱ्या टीम मध्ये प्रशांत बनकर व या सारख्या अनेक नराधमाचा समावेश आहे ही सर्व कर्तबगारी समोर येऊ नये म्हणून तुला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही अतिशय गंभीर बाब आहे.
या घटनेची योग्य प्रकारे दखल घेऊन शासनाने एस. आय. टी.चौकशी करून दोषीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व डॉ.संपदा मुंडे व मुंडे कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केले आहे.



