आज विडा येथे गर्दभ सवारीच्या परंपरेची प्रथा, कोणत्या जावई बापूंचा मान मिळणार सर्वत्र उत्सुकता

केज/प्रतिनिधी
आज बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात परंपरेनुसार धुली वंदनाच्या (होळी) निमित्ताने गर्दभ सवारी मिरवणुकीची तैयारी जोमात सुरू आहे.गेल्या ९० वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा यंदाही साजरी करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
विडा गावात धुलीवंदना च्यादिवशी येथे राहणाऱ्या जावयांना (सासरकडून आलेल्या नवऱ्यांना) गाढवावर बसवून वाजत-गाजत गर्दभ सवारी काढली जाते आणि संपूर्ण गावातून मिरवले जाते. ही पारंपरिक निजामशाही काळात जहागीरदार आनंदराव देशमुख यांच्या जावयाच्या गाढवावरून मिरवणुकी पासून सुरू झाली असा जनमानसात विश्वास आहे.दरवर्षी धुलीवंदनाच्या दोन दिवस आधी जावई शोध समिती ग्रामस्थांनी स्थापन केली जाते व गावाच्याजवळील जावईंचा शोध सुरू होतो परंतु यंदा अजून योग्य जावई सापडला नसल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.
जावाई सापडला की त्याला गुलालाची उधळत करीत, डीजेच्या तालावर संपूर्ण गावातून मिरवले जाते. मिरवणुकी नंतर हनुमान मंदिरासमोर जावयाला सोन्याची अंगठी व आकर्षक आहेर देऊन सन्मानाने सत्कार केला जातो. पहिल्यांदा मान मिळालेला जावई पुन्हा परंपरेत नाही सामील केला जात नाही.
मात्र यावर्षी मंगळवारी ३ मार्च आज रोजी उत्साहात हा सोहळा साजरा करण्यासाठी विडेकर ग्रामस्थ सज्ज झाले असुन कोणत्या जावायाला बहुमान दिला जाणार असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.



