कृषीसामाजिक

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी जलतारा प्रबोधन कार्यशाळा व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन, ८ नोव्हेंबरला हंगेवाडी येथे होणार उद्घाटन 

केज/प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग जल संवर्धनातून खुला होत असून,त्यासाठी जलतारा संकल्पना अत्यंत प्रभावी ठरत आहे.परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशिर्वादाने जलतारा प्रबोधन कार्यशाळा व प्रात्यक्षिकाचे आयोजन हंगेवाडी येथे ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. पुरुषोत्तम वायाळ सर असणार आहेत.त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२० साली वाडूर येथे जलतारा संवर्धन सुरू करून ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर यशस्वी उपाययोजना केल्या.या तंत्रज्ञानामुळे जमीनीची सुपीकता वाढत असून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होते,असा प्रत्यक्ष अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. त्यामुळे या कार्यशाळेतून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राहुल पाटील व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.राकेश गिड्डे तहसीलदार,केज, श्री.स्वप्नील उनवणे पोलीस निरीक्षक,श्री. विठ्ठल नागरगोजे गट विकास अधिकारी, श्री. राहुल गायकवाड,उप विभागीय कृषी अधिकारी श्री.सागर पठाडे,कृषी अधिकारी श्री.अॕड.संतोष सावरगावकर सचिव, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नांदुरघाट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जलतारा तंत्रज्ञानाचे लाभ ,पाण्याची बचत व भूजल स्तर नैसर्गिकरित्या वाढविण्यात मदत,कमी खर्चात जास्त उत्पादन, नैसर्गिकशेतीला प्रोत्साहन व रासायनिक खते वापरात घट,पिकांच्या मुळांना भरपूर ऑक्सिजन उपलब्ध, शेतात वर्षभर ओलावा टिकून राहण्यासाठी सहाय्यक असणार आहे.

“प्रत्येक शेतकऱ्यांनी शिकावा जलतारा…! प्रत्येक शेतात असावा जलतारा…!” हा प्रमुख संदेश यावेळी दिला जाणार आहे.या उपक्रमाचे आयोजन सर्व सहकारी हंगेवाडी व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,नांदूरघाट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!