केज शहरात घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन,सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत गाजत केली श्री ची स्थापना

केज/प्रतिनिधी
गणेश चतुर्थी निमित्ताने यावर्षी देखील केज शहरामध्ये गणरायाचे आगमन अगदी थाटामाटात झाले.हिंदु संस्कृतीमध्ये ऑगस्ट महिना प्रामुख्याने सण उत्सवाचा असतो. रक्षाबंधन झाले की, ऑगस्ट महिन्यात येणारा उत्साहाचा व आनंदाचा सण म्हणजे गौरी गणपती उत्सव यावर्षी दि.27 आॕगष्ट 2025 बुधवार रोजी घरोघरी गणपती बाप्पा चे आगमन आनंदात व मोठ्या उत्साहात झाले.
गल्लोगल्ली मध्ये, घरोघरी लहान मुले व स्त्री पुरुषांची बाजारात जावून घरी गणपती बाप्पाची मुर्ती आणण्या साठी लगबग दिसून येत होती.केज शहरामध्ये बाजारपेठेत गणपती च्या आकर्षक व सुरेख मुर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने बाजारपेठेत खरेदी साठी लोकांची गर्दी दिसून येत होती.
शहरातील लोकांनी आनंदी वातावरणात भक्तीभावाने गणरायाची घरोघरी स्थापना केली. यावर्षी गणपती बाप्पा चा दहा दिवसांचा मुक्काम असून अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीला विसर्जन होणारआहे.सार्वजनिक गणेश मंडळांनी ही विविध प्रकारचे देखावे सादर करण्याची तयारी केली असुन वाजत गाजत बाप्पाची मंडपात स्थापना केली आहे.



