
बार्शी/प्रतिनिधी
भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत आयुष ईन्स्टिट्यूट फॉर ऍडिक्शन मॅनेजमेंट,बार्शी येथे एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम ईन्स्टिट्यूटच्या क्लायंटसाठी घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन ईन्स्टिट्यूटचे सी.ई.ओ.डॉ.संदीप तांबारे सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून (सेबी) तसेच सी.डी.एस.एल चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सर यांनी उपस्थितांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी से.बी.तसेच सी.डी.एस. एल ची कार्यप्रणाली विशद केली.
तसेच बचत व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविधयोजना, डिमॅट अकाउंट,शेअर मार्केट,म्युच्युअल फंड, ई.टी.एफ व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.तसेच गुंतवणूक करत असताना काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच आर्थिक नियोजन हा व्यसनमुक्तीचा एक मार्ग होऊ शकतो त्यामुळे तो जीवनामध्ये अंगीकार करण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समुपदेशक सिंधुताई शिनगारे मॅडम व सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले तर सूत्रसंचालन समुपदेशक श्री.स्वप्निल जाधव सर यांनी केले या कार्यक्रमास क्लायंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल इन्स्टिट्यूट चे सी.ई.ओ.डॉ.स्वप्निल तांबारे सर यांनी से.बी.व सी.डी.एस.एल यांचे आभार व्यक्त केले.



