केज शहरात होणाऱ्या व्यापारी संकुलाला लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे-रोहीत कसबे

केज/प्रतिनिधी
केज शहरातील फलोत्पादनाची असणारी जमीन आज केज नगरपंचायतच्या ताब्यात गेली आहे तसेच केज नगरपंचायत च्या नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हारुण भाई इनामदार साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन ती जमीन निर्विवादपणे केज नगरपंचायतच्या ताब्यात आली आहे व त्या ठिकाणी भव्य व्यापारी संकुल उभा करून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना मार्ग काढत हे व्यापारी संकुल सर्वां साठी उभा होत आहे असे प्रतिपादन केले आहे.
तरी ही आनंदाची बातमी ऐकताच केज शहरातील दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व सकल मातंग समाज यांच्या वतीने या व्यापारी संकुलाला लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन मातंग समाजाची मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलअशी मागणी जोर धरत आहे तरी अण्णाभाऊ साठे यांची नाव या वापरला संकुलाला देण्यात यावी अशी मागणी दलिता अन्याय अत्याचार निर्मूलन समिती व त्यांचे सर्व पदाधिकारी यांची मागणी आहे .
या संदर्भाने लवकरच दलितांनी अत्याचार निर्मूलन समिती व त्यांची कोवर कमिटी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हारूणभाई इनामदार साहेब यांची भेट घेऊन मागणी करणार असे वृत्तांत दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे यांनी केले.



