सामाजिक

सारथी एज्युकेशन संस्थे कडून गरजू कुटुंबांना दिवाळी निमित्त किराणा साहित्य भेट,सारथी एज्युकेशनचा संस्थेचा गरजूंना आधार

केज/प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथील बँकिंग क्षेत्रात अधिकारी घडवणारी सारथी एज्युकेशन संस्था यांच्याकडून केज तालुक्यातील कुंबेफळ, सारणी,आनंदगाव, पिसेगाव, चंदनसावरगाव, कळमअंबा आदी गावातील शेतकरी, कामगार,मजूर,अनाथ अशा कुटुंबांना दिवाळी भेट म्हणून किराणा साहित्य वाटप केले. सारथी एज्युकेशन संस्थेचे संचालक राहुल मिसाळ ज्ञानदेव व्हराडे, सह शिक्षक अक्षय चोळके, प्रदीप व्हराडे,किरण औताडे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखाअधिकारी बीड आनंद कदम सीबीओ कळंब,डॉ.हनुमंतसौदागर, सरपंच अविनाश पांचाळ,सुरेश थोरात,प्रकाश थोरात,रतन थोरात,सुनिल थोरात,धनराज थोरात, मोतीराम थोरात,किशोर थोरात, विष्णु थोरात, संदिप थोरात,नरसिंग थोरात, आकाश थोरात, अमोल थोरात, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब इंगळे आदींच्या हस्ते किराणा किट भेट देण्यात आल्या.

यावेळी बोलताना राहुल मिसाळ म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडून ही छोटीशी भेट देत आहोत ते आमचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले.सर्दी एज्युकेशन संस्थेतून शिक्षण घेऊन अधिकारी बंधू-भगिनींनी निधी संकलन करून यामधून हे सेवा कार्य आम्ही चालवत आहोत.तरुणांना शिक्षणा साठी आम्ही काही मदत करतो असे मत व्यक्त केले.

कुंबेफळ येथील भूमिपुत्र एसबीआय बँकेत सीबीवो पदावर कार्यरत असलेले धनराज थोरात यांच्या समन्वयातून एक हजार गरजू कुटुंबांची दिवाळी गोड झाली यामुळे लाभार्थी कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!