स्वानंद सार्वजनिक वाचनालयात डॉ.मल्हारी लवटेंचा सत्कार सोहळा संपन्न.

केज/प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे गावातील संभाजी भानुदास लवटे यांचा मुलगा मल्हारी संभाजी लवटे हा बी.ए.एम.एस. डॉक्टर झाल्याबद्दल त्याचा स्वानंद सार्वजनिक वाचनालय आनंदगांव ता. केज जि.बीड च्या वतीने दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य सत्कार सोहळा घेवून मल्हारी संभाजी लवटे याचा शाल, श्रीफळ,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
मल्हारी संभाजी लवटे याचा डॉक्टर झाल्याबद्दल ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक,प्राचार्य, डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच मल्हारीचे वडिल त्यांची हलाखीची परिस्थिती असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट उपसले म्हणून संभाजी भानुदास लवटे यांचाही ग्रंथालयाच्या वतीने रविंद्र गायकवाड पेंटर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संभाजी लवटे म्हणाले की,मी २९ वर्षा पासून या स्वानंद सार्वजनिक वाचनालयाचा वाचक सभासद आहे. त्यामुळे मलाही वाचनाची आवड लागली व मुलाला ही वाचनाची सवय लागली,त्याचा परिणाम आज माझा मुलगा आज डॉक्टर झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. माझ्या व मुलाच्याही जडणघडणीत स्वानंद सार्वजनिक वाचनालयाचा व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांचा मोठा वाटा आहे.त्यामुळे मी कायम ग्रंथालयाचा ऋणी आहे.
सत्काराला उत्तर देतानाडॉ.मल्हारी संभाजी लवटे यांनी स्वानंद सार्वजनिक वाचनालय आनंदगांव ता. केज जि. बीड या ग्रंथालयाचे कार्य व प्रेरणादायी उपक्रम व नियमीत वाचन यामुळे मला दिशा मिळाली. या ग्रंथालयामुळे माझ्या सारख्या शेकडो विद्यार्थांना दिशा मिळाली असे सांगीतले.तर दहा जण आज शासकीय, अशासकीय नोकरीत आहेत.तसेच नवोदय साठीही बरेच विद्यार्थी लागले आहेत.
ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे २९ वर्षापासून कोणत्याही वाचक सभासदाकडूनी एक रुपयाही न घेता अखंड मोफत सेवा,सुविधा पुरवितात.स्वत: पैसे भरतात.गांवातील मुली- मुलांनी प्रगती करावी, तसेच स्वतःच्या नावा बरोबरच गावाचेही नाव करावे हि किमान अपेक्षा ठेवतात.ग्रंथालयाचा मी कायम ऋणी राहील अशी भावना बोलून दाखविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रा.पं.सदस्य रमेशराव गायकवाड, नारायण गायकवाड, बिरु सौदागर,एस.के.वैरागे, सुखदेव गायकवाड,शंकर लवटे ,ए.बी.गायकवाड, दादासाहेब गायकवाड, बन्सीनाना गायकवाड, कृष्णराजे गायकवाड, ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.वसुदेवबप्पा गायकवाड, रवींद्र गायकवाड पेंटर यांनीही मनोगतात मल्हारी संभाजी लवटे व संभाजी भानुदास लवटे यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन शंकर लवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र गायकवाड यांनी मानले.



