जोगेश्वरी मिसळ ग्रुपच्या वतीने कुंबेफळ येथील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड,गरजू कुटुंबांना किराणा साहित्य भेट

केज/प्रतिनिधी
‘मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना,दीप लावू अनाथांच्या उशाला रोज राती झोपताना” या ओळी सार्थ करत पुणे येथील जोगेश्वरी मिसळ आणि फरसाण ग्रुप उद्योजक सचिन पाटील, नितीन पाटील बंधूनी कुंबेफळ येथील गरजवंत शेतकरी,कामगार,मजूर,अनाथ अशा कुटुंबांना दिवाळी भेट म्हणून किराणा साहित्य वाटप केले. पुणे येथे कार्यरत असलेले महेश थोरात यांच्या समन्वयातून जोगेश्वरी उद्योग समूहाचे दानशूर हात पुढे आले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत पाच वर्षापासून सातत्य पूर्ण मदत करत आहेत. बीड जिल्ह्यात हजारो कुटुंब यांना त्यांनी मदत केली आहे.कुंबेफळ येथील गरजूंची दिवाळी गोड केल्याने कुटुंबांनी आनंद व्यक्त केला.
जोगेश्वरी ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या निधीतून बुधवार रोजी किराणा खरेदी करून किट तयार करून पॅकिंग करून प्रति कुटंबास भेट दिले.साखर, हरभरा डाळ,तांदूळ, मकापोहे तूप,शेंगदाणे, तेल,मैदा गरा,मुरमुरे, फरसाण,साबण चिवडा, खोबरं दाळवे,हळद,मसाला,आदी किराणा सामान किट तयार करून देण्यात आली.डॉ.हनुमंत सौदागर यांच्या हस्ते किराणा साहित्य किट देण्यात आल्या.
यावेळी सरपंच अविनाश पांचाळ, प्रकाश थोरात,धनराज थोरात,संपती थोरात, दादासाहेब थोरात, संदिप थोरात, नरसिंग थोरात, गोरख थोरात ,मोतीराम थोरात,विष्णु थोरात, राजेंद्र थोरात,किरण थोरात आदींनी सहभागी होऊन आपल्या माणसांची दिवाळी गोड केली. यावेळी डॉ.सौदागर म्हणाले की,सामाजिक सेवेसाठी असे आधाराचे हात पुढे येत आहेत यातून माणुसकी समृद्ध होत जाईल गरजूंच्या चेहऱ्या वरील आनंद अन्नदात्या हातांना बळ देत राहील असे मत व्यक्त केले.
विष्णू थोरात म्हणाले गावाकरिता जमेल ती मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही केवळ पोस्टमन आहोत ही सेवेची संधी मिळते यामध्ये आनंद आहे असे मत व्यक्त केले.लाभार्थी कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.या स्तुत्य उपक्रमा बद्दल लाभार्थी कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वृद्ध महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते.



