सादोळा व आनेगाव गाव भेटी दरम्यान मा. रमेशराव आडसकर यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सादोळा आणि आनेगाव परिसरातील शेतकरी व मच्छीमार नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी रमेशराव आडसकर यांनी दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामभेट घेतली.या दौऱ्यात त्यांनी मांजरा धरणात मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणींविषयी सविस्तर चर्चा केली.
मच्छीमार नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या परवानगी, पाणीस्तर आणि व्यवस्थापनाशी संबंधित अडचणींबद्दल मांडणी केली.या समस्या गांभीर्याने ऐकून श्री.रमेश आडसकर यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि “या समस्या दोन दिवसांच्या आत मार्गी लावाव्यात,” अशा स्पष्ट सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनीही त्वरित कारवाई करून समस्या निराकरणाचे आश्वासन दिले.
यानंतर त्यांनी आनेगाव येथे शेतकरी व ग्रामस्थांशी संवादसाधला. शेती ,पाणीपुरवठा आणि रस्ते दुरुस्ती आदी स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून नागरिकांना सकारात्मक आश्वासने दिली.ग्रामविकासासाठी नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहू,असेही श्री.रमेश आडसकर यांनी स्पष्ट केले.
या गावभेटी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष श्री.अमर भैय्या पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास थळकरी ,माजी सरपंच बाळासाहेब नांदे ,माजी चेअरमन शंकरराव इंगळे, आप्पासाहेब मोरे,शोकत शेख ,श्रीराम इंगळे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामभेटी मुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रश्न तातडीने सुटण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



