उद्योगसामाजिक

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देणार – चेअरमन रमेशराव आडसकर यांचे 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन  

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची 48 वी वार्षिक सर्व साधारणसभा सभासद, उस उत्पादक याच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली.  अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि. अंबासाखर, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड च्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन चेअरमन रमेशराव आडसकर यांनी तर विषय वाचन कार्यकारी संचालक डी.एन. मरकड यांनी केले.

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या वार्षिक सभेचे अहवाल वाचनकरताना चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले कि, कारखान्यास यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत असून मागील पन्नास वर्षांमध्ये या कारखान्याचे अनेक चढउतार आपण पहिले आहेत तसेच अनेक अडचणींना आपण सामोरे गेलेलो आहोत.

या कारखान्याचे संस्थापक मा.श्री ज्ञानोबारावजी पाटील व संस्थापक माजी आमदार मा.श्री. बाबुरावजी आडसकर साहेब यांनी लावलेल्या या सहकाराच्या रोपट्या मुळे सहकारी चळवळीला बळकटी मिळाली तसेच या सहकारी साखर कारखान्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत झाली साखर कारखानदारी दर तीन ते चार वर्षात दुष्काळाला सामोरे जाते.तसेच गाळपास सातत्य राहत नाही व हा उद्योग हंगामी चालत असल्यामुळे वेळोवेळी कारखानदारी समोर आर्थिक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत.अशा परिस्थितीमध्ये सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे व सहकारी चळवळीला बळकटी मिळाली पाहिजे म्हणून हा कारखाना चालू राहावा यासाठी माझेप्रामाणिक प्रयत्न राहिलेले आहेत.

हा कारखाना टिकला पाहिजे व सहकारी चळवळीला बळकटी मिळाली पाहिजे याच उदास हेतूने माझी सर्व राजकीय प्रतिष्ठापणाला लावून राज्य शासना मार्फत राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली याच्याकडून खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन रुपये 80 कोटी मंजूर करून घेतले आहे.बीड जिल्हा सहकारी बँक,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक,सांगली,शुगरकेन डेव्हलपमेंट फंड नवी दिल्ली या संस्थेचे एक रकमी परत फेडीनुसार थकित देणे देण्यात आले.

तसेच थकीत तोडणी वाहतूक ,थकीत प्रॉव्हिडंट फंड व महा वितरणची थकलेली रक्कम या सर्व रकमा कारखान्याने अदा केल्यामुळेच व उर्वरित रकमेचा उपयोग कारखान्याची जुनी झालेली प्लांट व मशिनरीचे देखभाल दुरुस्ती व काही प्रमाणात मशिनरीचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे रुपये 80 कोटी कर्जाचा विनियोग अत्यंत काटकसरीने व योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. येणाऱ्या गळीत हंगाम 2025 – 26 मध्ये चार लाख मॅट्रिक टन ते साडेचार लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलेअसून कारखाना अत्यंत कार्यक्षमतेने चालणार आहे. कारखान्याकडे असणारी 30 के एल पी.डी असवानी प्रकल्पातील आपण रेक्टिफाइड स्पिरिटचे उत्पादन घेत होतो,मात्र यापुढे आपण इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे.

त्यामुळे काही प्रमाणात कारखान्याला आर्थिक फायदा होणार आहे. कारखान्याच्या कार्य क्षेत्रामध्ये उसाचे उत्पादन वाढीसाठी यापुढे प्रयत्न करणार असून कृतीम बुद्धिमतेचा वापरकरून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीचा फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढे हा कारखाना सक्षमपणे चालवणार आहोत व उपपदार्थ निर्मितीवर भर देणार आहोत असे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी सांगितले.ते पुढे बोलताना म्हणाले कि, हा अंबा कारखाना सलग तीन वर्ष साडे चार ते पाच लाखमॅट्रिक टन ऊसाचे गाळप झाले तर कारखाना नक्कीच कर्जमुक्त होईल व कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल असे त्यानी सांगितले.याप्रसंगी व्हाइस चेअरमन श्री.

दत्तात्रय (आबा) पाटील वार्षिक सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,या वर्षी हा कारखाना इतर कारखान्याच्या  बरोबरीने भाव देणार असुन सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी देण्याचे आवाहन केले.असुन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बॉयलर अग्नी प्रदिपन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वार्षिक सभेसाठी प्रामुख्याने सर्व श्री संचालक अॕड. प्रमोद जाधव ,ऋषिकेश आडसकर, संभाजी इंगळे ,लक्ष्मीकांत लाड, अशोक गायकवाड, गोविंद देशमुख, राजेभाऊ औताडे, विजय शिनगारे, बालासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर,अनिल कीर्दत, जीवनराव कदम, लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठलराव देशमुख ,शशिकांत लोमटे,मिनाज पठाण, रमाकांत पिंगळे ,सुरेश साखरे ,कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, चीफ अकाउटंट सुरेश बोराटे ,वर्कर्स मॅनेजर धीरज वाघोले, मुख्य शेतकी अधिकारी सचिन बागल,चिफ केमिस्ट केशव पाटील, ऊस पुरवठा अधिकारी आनंद शिंदे,चीफ इंजिनिअर प्रशांत सोनार,डिस्टलरीइन्चार्ज प्रकाश साळुंखे यांच्या सह सेवा सह सोसायटी आडसचे चे अरमन उध्दवराव इंगोले , धारूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक भारतराव सोळंके व विजयकुमार खुळे, खोडस चे सरपंच रामधन लाखे यांच्यासह सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, मुकदम, ठेकेदार, कारखान्यातील कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन आसरडोहचे सरपंच रवी देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सनगाव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन पांडुरंग अंजान यांनी केले आणि वार्षिक सभा सुरळीत व नियोजनबध्द करण्या साठी अनिल माचवे सर यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!