केज शहरातील कन्हैय्या इव्हेंट्स्च्या दांडिया महोत्सवात थिरकला महिला वर्ग ,महीलांसह युवतीनी ही लुटला आनंद

केज/प्रतिनिधी
नवरात्र उत्सवामध्ये नारी शक्तीला खुप विशेष महत्व असते. म्हणून मोठ्या शहरा मध्ये जसे महिलांसाठी दांडीयाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तसाच दांडिया महोत्सव केज सारख्या छोट्या शहरात महिलां साठी घेण्याचे स्वप्न होते ते या दांडिया महोत्सवाचे आयोजन करून पूर्ण केले व केज शहरातील महिलांना कन्हैय्या इव्हेंटसच्या माध्यमातून एक मुक्त सांस्कृतिक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देवू शकलो याचा मनस्वी आनंद होत आहे असे कन्हैय्या इव्हेंटस्चे संचालक रोहन वेदपाठक यांनी सांगितले.
कन्हैय्या इव्हेंटंस्च्या माध्यमातून दि.26,27,28 सप्टेंबर 2025 रोजी उत्सव फंक्शन हॉल,कानडी रोड केज या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवा मध्ये केज शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून आनंद घेतला.तीन दिवसीय दांडिया महोत्सवात विविध उपक्रम,आकर्षकविद्यूत रोषणाई,दर्जेदार साऊंड सिस्टीम,सेल्फी पॉईंट महिलांसाठी करण्यात आले होते.समारोप प्रसंगी सहभागी सर्व महिलांना व युवतींना सन्मानचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी सर्वांनी आनंद लुटत समाधान व्यक्त केले आहे.



